मुंबईत १८ अत्याधुनिक सुविधा केंद्र महापालिका ७८ कोटी खर्च करणार

मुंबई- मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने शहरातील १८ रहदारीच्या ठिकाणी अत्याधुनिक सुविधा समुदाय केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पालिका प्रशासन ७८ कोटी रुपये खर्च करणार आहे. तसेच मुंबईतील झोपडपट्टी भागातील नागरिकांसाठी १६ ठिकाणी सुविधा केंद्र बांधली जाणार आहेत. त्यामध्ये नाममात्र दरात मशिनद्वारे कपडे धुण्याची सोय उपलब्ध असणार आहे.

मुंबईतील हाजीअली, वरळी,सायन,मुलुंड,माहीम वांद्रे आदींसह १८ ठिकाणी ही अत्याधुनिक सुविधा केंद्र उभारली जाणार आहेत. शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या मुंबईची लोकसंख्या दीड कोटींच्या घरात आहे. भविष्यात त्यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान,पालिकेने झोपडपट्टी भागातील नागरिकांसाठी १६ सुविधा केंद्र बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्याठिकाणी नाममात्र शुल्क घेऊन कपडे धुण्याची स्वयंसेवा पद्धतीच्या यंत्राची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.तसेच विजेऐवजी सौरऊर्जा पॅनेल्स देखील बसविली जाणार आहेत. त्यासाठी अंदाजे ५१ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top