मुंबई- मुंबईत मतदानाच्या दिवशी विशेष लोकल धावणार आहेत. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. दरम्यान, मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने रात्रकालीन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मतदानाच्या वेळी मतदारांना लांबचा प्रवास करावा लागतो , निवडणूक अधिकारी, कर्मचारी हे उशिरापर्यंत कर्तव्यावर असतात. अशावेळी त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निवडणूक कर्तव्य बजावणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना या सेवांचा फायदा होणार आहे. या गाड्या २० नोव्हेंबर रोजी पहाटे आणि मध्यरात्री उशिरा डाउन मार्गावर सीएसएमटी-कल्याण, सीएसएमटी-पनवेल आणि अप मार्गावर कल्याण-सीएसएमटी, पनवेल-सीएसएमटी या मार्गावर धावणार आहेत.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |