मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डेरात्री शोधा ! पण तत्काळ बुजवा

*पालिका आयुक्तांचे रस्ते
अभियंत्यांना निर्देश

मुंबई- मुंबईत दमदार पावसाला सुरुवात होण्याआधी पालिका प्रशासन सतर्क झाले आहे. पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मुंबईकरांना त्रास होऊ नये म्हणून पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी हे खड्डे शोधण्यासाठी रात्री फिरा,पण दिसणारे खड्डे तातडीने बुजवा,असे निर्देश रस्ते अभियंत्यांना दिले आहेत.

पालिका आयुक्त बांगर यांनी सांगितले की,मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची कार्यवाही करण्यासाठी २२७ प्रभागात सहाय्यक रस्ते अभियंत्यांची नियुक्ती केली आहे.एक अभियंता १० किमी परिसरातील खड्ड्यांचा शोध घेऊन ते तत्काळ बुजवण्याची कार्यवाही करेल.मुंबईतील वाहतुककोंडी पाहता दिवसा खड्डे शोधणे आणि ते बुजवणे शक्य होणार नाही. त्यामुळे रात्री फिरल्यावर कुठल्या रस्त्यांवर खड्डे आहेत हे स्पष्ट होईल. खड्ड्यांच्या तक्रारीसाठी हेल्पलाईन नंबरही जारी करण्यात आला आहे.मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत सुमारे २२५० किमी लांबीचे रस्ते आहेत.या रस्त्यांवर यंदा पाणी तुंबू नये म्हणून खबरदारी घेतली जाणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top