मालगाडीची चाके मातीत रुतली सुरत-नंदुरबार रेल्वेसेवा विस्कळीत

नंदुरबार- नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यासह चिंचपाडा परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने सुरत-भुसावळ रेल्वे मार्गावर कोळदे ते चिंचपाडा दरम्यान पाणी आले . रेल्वेमार्गावर मातीचा भराव वाहून आल्याने चिंचपाडा रेल्वे स्थानकाजवळ मालवाहू रेल्वेगाडी या मातीमध्ये रुतली. त्यामुळे सुरत-नंदुरबार रेल्वेसेवा विस्कळीत झाली.

चिंचपाडा रेल्वे स्थानकाजवळ महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली रेल्वे मार्गाला संरक्षक भिंत त्यामुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहून आले होते. पाण्याबरोबर मातीचा ढिगारादेखील वाहून आला होता, त्यामुळे रेल्वे रुळावर पाणी आणि माती मोठ्या प्रमाणात साचली. रेल्वेरुळ मातीखाली गेल्याने मालगाडी रेल्वे रुळावरच अडकली. त्यामुळे सुरतहून भुसावळकडे जाणारी वाहतूक सकाळी बंद करण्यात आली होती. परिणामी या मार्गावरील अनेक रेल्वे गाड्या या विविध स्टेशनवर थांबून होत्या. रुळावर वाहून आलेला मातीचा भाराव काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु होते. मात्र रेल्वेची वाहतूक चार तास बंद होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top