मार्च महिन्यात बँकांना तब्बल १४ दिवस सुट्टी

मुंबई- रिझर्व्ह बँकेने यंदाच्या मार्च महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार देशभरातील बॅंका तब्बल एकूण १४ दिवस बंद राहणार आहेत.त्यामध्ये ४ रविवार आणि २ शनिवारसह होळी,महाशिवरात्री आणि गुड फ्रायडेसारखे सणही आहेत.यादिवशी बॅंका बंद राहणार आहेत.
सध्याच्या डिजिटल युगात बँकिंगची बहुतांश कामे घरी बसून ऑनलाइन करता येतात.मात्र असे असूनही अनेक कामे अशी आहेत जी बँकेत गेल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत. त्यामुळे मार्च महिन्यात असे काही काम असेल तर ते सुट्ट्यांची यादी पाहूनच करावे लागणार आहे.१ मार्च मिझोराममध्ये छपचार कुट सणानिमित्त बँका बंद राहतील.तर ३ मार्च रविवार साप्ताहिक सुट्टी,८ मार्च महाशिवरात्री निमित्त गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश,ओडिशा,पंजाब, उत्तराखंड,आंध्र प्रदेश, तेलंगणा,जम्मू, उत्तर प्रदेश, केरळ,उत्तर प्रदेश, छत्तीसगड,झारखंड,शिमला या राज्यांमध्ये बॅंका बंद राहतील.त्याचप्रमाणे ९ मार्च दुसरा शनिवार आणि ९ मार्च,१७ मार्च रविवार साप्ताहिक सुट्टी,२२ मार्च बिहार दिनानिमित्त बिहारच्या बँकांना सुट्टी, २३ मार्च चौथा शनिवार
आणि २४ मार्च रोजी रविवार साप्ताहिक सुट्टी,तसेच २५ मार्च होळीमुळे बंगळुरू, भुवनेश्वर,चेन्नई,इंफाळ,कोची, कोहिमा,पणजी, श्रीनगर आणि केरळ झोन वगळता संपूर्ण देशात बॅंकांना सुट्टी असणार आहे. तसेच २६ मार्च होळीमुळे भुवनेश्वर, इंफाळ, पणजी आणि २७ मार्च होळीमुळे बिहारमध्ये बँका बंद राहतील.त्यानंतर २९ मार्चला गुड फ्रायडेमुळे श्रीनगर,शिमला,जम्मू,
जयपूर,गुवाहाटी आणि आगरतळा झोन वगळता संपूर्ण देशात आणि ३१ मार्च रविवार रोजी बॅंकांना साप्ताहिक सुट्टी असणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top