मुंबई – सातारा जिल्ह्यातील कथित अफरातफर प्रकरणी मायणी मेडिकल कॉलेजच्या तत्कालीन अध्यक्षाला मुंबई उच्च न्यायालयाने वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर केला आहे.
एमबीबीएस अभ्यासक्रमाची परवानगी नसलेल्या महाविद्यालयात वैद्यकीय उमेदवारांना प्रवेश देऊन ६५.७ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ईडीने महादेव देशमुख व इतरांवर गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर त्यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मे २०२२ मध्ये अटक केली होती. ते मागील तीन वर्षांपासून तुरुंगात होते.६९ वर्षीय देशमुख यांची प्रकृती ठीक नसताना त्यांना जवळपास तीन वर्षे तुरुंगात ठेवले. ईडीकडून खटल्याला गतीही दिली जात नाही. या परिस्थितीत त्यांना कोठडीत ठेवल्याने त्यांच्या मूलभूत हक्कांवर गदा येत असल्याचा दावा करीत त्यांनी अॅड. संदीप कर्णिक यांच्या माध्यमातून जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता.
