मानसिक आजाराला कंटाळून डच तरुणीला इच्छामरण हवे

द हेग
शारिरीक आणि मानसिक आजारपणाला कंटाळून एका डच महिलेने इच्छामरणाचा पर्याय निवडला आहे. २८ वर्ष वयाच्या झोराया टेर बिक हिने मे महिन्यात मृत्युची इच्छा व्यक्त केली आहे. आपल्या आजारपणामुळे त्याचप्रमाणे विविध मानसिक आजारांमुळे तिने हा पर्याय निवडला आहे. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनीही तिच्या या इच्छेला दुजोरा दिला असून तिच्यावरील उपचारावर आता आम्हाला करता येण्यासारखे काहीही नाही असे म्हटले आहे. तिच्या स्थितीत सुधारणा होणे शक्य नसल्याचेही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले .
झोराया ही आपल्या मित्रासोबत राहात असून प्रकृतीत सुधारणा होणे शक्य नसल्याने आपण हा पर्याय निवडला असल्याचे सांगितले आहे. झोयाराने मे महिन्यात आपल्याला मृत्यू देण्यात यावा अशी इच्छा व्यक्त केली असून त्यावेळी आपल्याबरोबर कोण कोण असेल हेही स्पष्ट केले आहे. तिचा मित्र व डॉक्टर हे यावेळी सोबत असतील. तिचे कुटुंब नसल्यामुळे तिच्यावर अंत्यसंस्कार होणार नसून तिच्या अस्थी जंगलात ठेवण्यात येणार आहेत. ही जागाही ती आणि तिच्या मित्राने एकत्रितपणे ठरवली आहे.
स्थानिक माध्यमामध्ये आलेल्या अहवालानुसार सध्या नेदरलँडमध्ये अनेकजण इच्छामरणाचा पर्याय निवडत आहेत. आर्थिक विवंचना, हवामान बदल, समाजमाध्यमांचा अतिरेकी वापर व इतर अनेक कारणांमुळे ही वाढ झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
२०२२ मध्ये नेदरलँडमध्ये ८ हजार ७२० जणांनी पत्करले होते. हे प्रमाण देशातील एकूण मृत्युंच्या ५ टक्के होते. त्यानंतरही प्रतिवर्षी किमान ४ टक्के नागरिक हा पर्याय निवडत असल्याचेही या अहवालात म्हटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top