मुंबई- पावसाळ्यात बंद ठेवण्यात आलेली नेरळ-माथेरानची मिनी ट्रेन आजपासून पुन्हा धावली. यंदाच्या वर्षी ८ जून ते १५ ऑक्टोबर या कालावधीत नेरळ ते अमन लॉजदरम्यानची नियमित सेवा पावसामुळे बंद ठेवण्यात आली होती. नंतर हा कालावधी ५ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आला होता.
माथेरान येथून रोज सकाळी ८.२०, सकाळी ९.१०, सकाळी ११.३५, दुपारी २, दुपारी ३.१५, सायंकाळी ५.२० वाजता ही गाडी सुटेल. ही गाडी अमन लॉज येथे अनुक्रमे सकाळी ८.३८, सकाळी ९.२८, सकाळी ११.५३, दुपारी २.१८, दुपारी ३.३३, सायंकाळी ५.३८ वाजता पोहोचेल. अमन लॉज येथून रोज सकाळी ८.४५, सकाळी ९.४५, दुपारी १२, दुपारी २.२५, दुपारी ३.४०, सायंकाळी ५.४५ वाजता सुटेल. तर माथेरान येथे अनुक्रमे सकाळी ९.०३, सकाळी ९.५३, दुपारी १२.१८, दुपारी २.४३, दुपारी ३.५८, सायंकाळी ६.०३ वाजता पोहोचेल. शनिवारी-रविवारी विशेष गाडी माथेरान सकाळी १०.०५, दुपारी १.१० वाजता सुटेल. ही गाडी अमन लॉज येथे सकाळी १०.२३ दुपारी १.२८ वाजता पोहोचेल. तर अमन लॉज येथून विशेष गाडी सकाळी १०.३०, दुपारी १.३५ वाजता सुटेल आणि माथेरान येथे अनुक्रमे सकाळी १०.४८, दुपारी १.५३ वाजता पोहोचेल.