मातोश्रीवर उद्या पदाधिकारी बैठका

मुंबई – विधानसभा निवडणुकांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे २६ डिसेंबरपासून मातोश्रीवर पदाधिकाऱ्यांचे बैठकसत्र सुरू करणार आहेत.या बैठकांमध्ये ते महानगरपालिका निवडणूक तयारीचा आढावा विधानसभा निहाय मतदारसंघ पदाधिकाऱ्यांच्या बैठकांतून घेणार आहेत.