जम्मू- कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जम्मू-काश्मीरमधील माता वैष्णोदेवीच्या भक्तांसाठी आता खास ‘रोप वे’ उभारला जाणार आहे. या रोप वेच्या योजनेला श्री माता वैष्णोदेवी देवस्थान मंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता भाविकांचा तब्बल १३ किलोमीटरचा उंच खडतर प्रवास काही मिनिटांत पूर्ण होणार आहे.
माता वैष्णोदेवी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंशुल गर्ग म्हणाले की, भाविकांची वाढती संख्या तसेच वृद्ध आणि अपंग यात्रेकरूंचा प्रवास सुलभ करण्यासाठी हा बहुप्रतिक्षित रोपवे प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे.रोपवे प्रकल्पाला काही स्थानिक लोकांचा विरोध आहे.परंतु स्थानिक लोकांची अडचण लक्षात घेऊन हा प्रकल्प राबविला जाणार आहे.रोपवे तारकोट मार्गाला मुख्य इमारतीशी जोडला जाणार आहे. रोपवेच्या साहाय्याने प्रवासी सांझी छत येथे जातील. सांझी छत ते माता भवन असा भाविक पायी प्रवास करतील.माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी दररोज मोठ्या संख्येने भाविक येत m असतात.माता भवनात जाण्यासाठी भाविकांना १३ किलोमीटरचा खडतर प्रवास करावा लागतो. शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त प्रवासी हा प्रवास सहज करू शकतात,परंतु आजारी किंवा अपंग व्यक्तींना घोडा,
खेचर किंवा पालखीची मदत घ्यावी लागते.मात्र आता या रोपवेवरून दररोज हजारो भाविकांना प्रवास करता येणार आहे.त्यामुळे पारंपारिक ट्रेकिंग मार्गावरील गर्दीही कमी होईल आणि ज्या प्रवासाला काही तास लागत होते.तो प्रवास काही मिनिटांवर कमी होईल.माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दरवर्षी वाढत आहे.२०२३ मध्ये या यात्रेने ९५ लाख भाविकांनी नवा विक्रम केला होता.यावर्षी आतापर्यंत ८६ लाख भाविकांनी माता वैष्णोदेवीचे दर्शन घेतले आहे.अशा परिस्थितीत लाखो भाविकांना चांगली सुविधा मिळावी यासाठी या रोपवे प्रकल्पाला प्राधान्य दिले जात आहे.