माजी राष्ट्रपती प्रतिभाताईंची प्रकृती स्थिर! उपचार सुरू

पुणे :

देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी पुण्यातील भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. प्रतिभाताई छातीत जंतुसंसर्गामुळे गेले काही दिवस त्रस्त होत्या. बुधवारी अधिकच अस्वस्थ वाटू लागल्याने कुटुंबियांना त्यांना रुग्णालयात उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

गेल्या काही दिवसांपासून प्रतिभाताई पाटील यांची प्रकृती ठीक नव्हती. छातीतील जंतुसंसर्गामुळे त्यांना सतत ताप येत होता. आता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कायदेतज्ज्ञ असलेल्या प्रतिभाताई जळगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. आरोग्य, पर्यटन, संसदीय कार्य, गृहनिर्माण, समाजकल्याण सांस्कृतिक, सार्वजनिक आरोग्य समाजकल्याण, दारूबंदी पुनर्वसन, शिक्षणमंत्री अशी मंत्रिपदे त्यांनी भूषवली असून त्या विधानमंडळ नेत्या, राज्यसभेच्या खासदार होत्या. त्यांनी राज्यसभेच्या उपाध्यक्षा म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top