माकुणसार गावात १६ एप्रिलला चामुंडा देवीची वार्षिक यात्रा

मुंबई- पालघर तालुक्यातील श्री क्षेत्र माकुणसार येथील श्री चामुंडा देवीचा वार्षिक यात्रा उत्सव यंदा बुधवार १६ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने दिवसभरात अभिषेक आरती,दर्शन आरंभ,भजन, महाप्रसाद,सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत.

या यात्रा उत्सवात श्रीहरी मंदिर,श्री दत्त मंदिर, श्री ब्रह्मदेव मंदिर, श्री एकविरा माता मंदिर, श्री इच्छापूर्ती साईबाबा मंदिर, श्री राम मंदिर, श्री वेताळदेव मंदिर यांचा सहभाग असतो. चामुंडा देवी १६०० सालामध्ये श्रीक्षेत्र माकुणसार गावात अवतरल्याची आख्यायिका आहे. तरी या उत्सवाकरिता सर्व भाविक भक्तगण व माहेरवाशिणींनी उपस्थित राहावे, असे आवाहन चामुंडा देवी मंदिर विश्वस्तांतर्फे करण्यात आले आहे.