धाराशिव – लातूर,धाराशीव व बीड अशा तीन जिल्ह्यासाठी वरदान ठरणारे मांजरा धरण अखेर आज बुधवारी दुपारी ओसंडून वाहू लागले.त्यामुळे या धरणाचे दोन दरवाजे ०.२५ मिटरने उंचावून १ हजार ७३० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
धाराशीव जिल्हयातील कळंब,बीड जिल्ह्यातील केज, अंबाजोगाई व लातूर जिल्ह्यातील लातूर व रेणापूर तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीला या धरणाचा फायदा होतो.याशिवाय लातूर शहर, लातूर औद्योगिक वसाहत, कळंब, केज, अंबाजोगाई, धारूर, मुरूड अशा शहरासह शेकडो गावातील पाण्याचा प्रश्न भागवणारा प्रकल्प म्हणून या धरणाकडे पाहिले जाते.यामुळेच हे धरण भरले का, याकडे तिन्ही जिल्ह्याचे लक्ष लागलेले असते.यंदा या प्रकल्पात प्रथमच जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पडलेल्या पावसामुळे थोडी आवक झाली होती.मात्र,धरण पूर्ण क्षमतेने भरले नव्हते.अखेर २१ सप्टेंबरनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढला होता.अखेर आज हा प्रकल्प आपल्या ६४२ मीटर पाण्याच्या उच्चतम पातळीच्या जवळ पोहचला.