मुंबई – गौरी गणपतीचे दिवस आले की घरांच्या साफसफाईची सुरुवात होते. हे साफसफाईचे काम कष्टाचेच असते. एका महिलेने मात्र त्यापुढे जात चक्क १६ व्या मजल्यावरील खिडकीची बाहेरुन साफसफाई केली. तिच्या या चित्तथरारक साफसफाईचा व्हिडीओ व्हायरल झाला.मुंबईच्या कांजूरमार्ग मधील एका इमारतीमधील ही घटना असल्याचे म्हटले जात आहे. या व्हिडीओत एक महिला कोणत्याही संरक्षणाशिवाय १६ व्या मजल्यावरील फ्लॅटच्या खिडकीबाहेर उभी राहून साफसफाई करत असल्याचे दिसत आहे. ही महिला घरकाम करणारी असून नेटकऱ्यांनी तिच्याकडून हे काम करुन घेणाऱ्या घरमालकिणीवर टीका केली आहे. १६ व्या मजल्यावर बाहेरच्या बाजूने साफसफाई करणे धोकादायक असते. वारा व उंचीमुळे कधीही तोल जाऊ शकतो. त्यामुळे अनेक नेटकऱ्यांनी या महिलेच्या काळजीपोटी तिच्या कडून काम करुन घेणाऱ्याला खडे बोल सुनावले आहेत. तर काहींनी ती स्टंटवूमन आहे का असे म्हणत तिच्या या धाडसाचे कौतुक केले आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |