‘महाराष्ट्र शासन’ लिहिलेल्या खाजगी वाहनांवर कारवाई!

जळगाव – महाराष्ट्र शासनाच्या स्वमालकीची वाहने वगळता खासगी वाहनावर ‘महाराष्ट्र शासन’ लिहण्यास व आतील भागात ‘महाराष्ट्र शासन’ नावाची लाल रंगाची पाटी लावण्यास मनाई करण्यात आली आहे.

यापुढे ‘महाराष्ट्र शासन’ नाव, लाल रंगाची पाटी लावून तसेच वाहनाच्या आतील भागास स्टीकर चिकटवून अशी वाहने रस्त्यावर फिरताना आढळली तर अशा वाहनांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.खासगी वाहनांवर किंवा वाहनांत महाराष्ट्र शासन अशा पाटी किंवा बोधचिन्हाचा वापर होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर मोटार वाहन अधिनियन व त्याअंतर्गत नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तरी सर्व वाहन धारकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन बुरूड यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top