महादेव बेटिंग ॲपशी संबंधित ३८८ कोटींची मालमत्ता जप्त

छत्तीसगड- महादेव ऑनलाइन सट्टेबाजीतील मनी लाँड्रिंगच्या केसमध्ये ईडीनेमोठी कारवाई करत सुमारे ३८८ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या प्रकरणी छत्तीसगडमधील विविध उच्चपदस्थ राजकारणी तसेच नोकरशहावर संशय आहे.

या प्रकरणाच्या तपासात आतापर्यंत १९.३६ कोटी रुपयांची रोख रक्कम आणि १६.६८ कोटी रुपयांची मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त मालमत्तांमध्ये जंगम मालमत्तांचा समावेश आहे. यात मॉरिशसस्थित कंपनी टॅनो इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज फंड, दुबईस्थित हवाला ऑपरेटर हरी शंकर टिबरेवाल यांच्याशी संबंधित ईएफपीआय आणि एफडीआयच्या माध्यमातून केलेली गुंतवणूक, छत्तीसगड, मुंबई येथील अनेक बेटिंग ॲप्स आणि वेबसाइट्सचे प्रवर्तक, पॅनेल ऑपरेटर यांचा समावेश आहे. यातील मध्य प्रदेशातील मालमत्ता प्रवर्तकांच्या सहकाऱ्यांच्या नावावर आहेत.या प्रकरणी ईडी टिबरेवाल यांची चौकशी करत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top