मराठी पाट्या न लावणाऱ्या३ हजार दुकानदारांना नोटिसा

मुंबई- सर्वोच्च न्यायालयाने व्यापारी असोसिएशनला दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी दिलेली मुदत संपली आहे. त्यामुळे आता मुंबई पालिका प्रशासनाने दुकानांवर मराठी पाट्या न लावणाऱ्यांवर कारवाई मोहीम सुरू केली आहे. पालिकेने अशा ३ हजार ४० दुकानदारांना नोटिसा जारी केल्या असून २११६ जणांविरुद्ध न्यायालयात खटले भरले आहेत.
पालिकेने आतापर्यंत मुंबईतील ८७ हजार ४७ दुकानांची तपासणी केली. त्यानंतर प्रत्यक्ष कारवाई मोहिमेत ३० लाख ३७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच ३०४० दुकानदारांना नोटिसा, तर २११६ न्यायालयात खेचण्यात आले आहे. दुकानांवर मराठी पाटी नसल्यास कायद्यानुसार प्रति कामगार दोन हजार ते एक लाखांपर्यंत दंड होणार आहे. तर वारंवार दुर्लक्ष करणाऱ्याकडून दररोज २ हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top