मध्य रेल्वेकडून सहा दिवसांचा मेगाब्लॉक

  • पुण्याकडे जाणाऱ्या 19 गाड्या रद्द होणार
    पुणे
    दौंड रेल्वे स्थानकावरील विविध कामासाठी मध्य रेल्वेकडून 27 जुलै ते 1 ऑगस्टदरम्यान असा सहा दिवसांचा मेगाब्लॉक घेणार आहे. यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या 19 गाड्या रद्द केल्या जाणार आहेत तर 22 एक्सप्रेस गाड्यांचे मार्ग बदलले जाणार आहेत. यामुळे मुंबई-पुणे प्रवास करण्यांचे हाल होणार आहेत.
    या ब्लॉकमुळे सोलापूर-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस 3 दिवसांसाठी रद्द करण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते विशाखापट्टणम एक्स्प्रेस ही गाडी 29 जुलै ते 1 ऑगस्टदरम्यान पुर्ण-मिरज-कुर्डुवाडी मार्गे रवाना होईल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – बंगळुरू एक्स्प्रेस ही गाडी ब्लॉक काळात पुणे-मिरज-कुर्डूवाडी मार्गे रवाना केली जाईल. त्यासोबतच बंगळुरु – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस 27 ते 31 जुलैपर्यंत कुडुवाडी-मिरज-पुणे मार्गे वळवली जाईल. नागरकोईल-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस ही गाडी 28 जुलै रोजी गुंतकल-बल्लारी-हुबळी-मिरज-पुणे मार्गे रवाना होईल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागरकोयल ही गाडी 29 जुलै रोजी पुणे-मिरज-हुबळी-बल्लारी-गुंतकल मार्गे आणि चेन्नई – एकतानगर एक्स्प्रेस ही गाडी 28 जुलै रोजी गुंतकल- बल्लारी- हुबळी- मिरज-पुणे मार्गे धावेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top