मध्य प्रदेशमध्ये आता उघड्यावर मांस-मच्छी विकण्यावर बंदी

इंदूर – मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या आदेशानुसार इंदूर महानगरपालिकेने उघड्यावर मांस-मच्छी विकणाऱ्या छोट्या स्टॉलधारकांनावर धडक कारवाई सुरू केली असून येत्या पंधरा दिवसांत दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
इंदूर महानगरपालिकेने जारी केलेल्या आदेशानुसार शहरात कुठेही आणि विशेषतः मंदिरांच्या आसपास मांस-मच्छीची विक्री करणाऱ्या दुकानदारांना पंधरा दिवसांत व्यवसाय बंद करावा लागणार आहे. मुख्यमंत्री यादव यांच्या पहिल्याच कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत अन्नसुरक्षा कायदा – २००६ ची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कायद्यानुसार उघड्यावर खाद्यपदार्थ विकण्यास बंदी आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top