मतदानाच्या दिवशी बीडचे सर्व आठवडी बाजार बंद

बीड – विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी म्हणजेच २० नोव्हेंबरला बीड जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद राहणार आहेत. याबाबतचा आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी दिला आहे.बीड तालुक्यातील चौसाळा, गेवराई, गुळज, मारफळा, राजपिंप्री, मालेगाव खु., किनगाव, शिरूर कासारमधील जाटनांदूर, मातोरी, पाटोद्यातील पिठ्ठी, आष्टी तालुक्यातील पिंपळा, दौलावडगाव, खडकत, आष्टा ह.ना. केरूळ, डोईठाण, हातोला, माजलगाव तालुक्यातील मोठेवाडी, एकदरा, गंगामसला, माजलगाव, वडवणी तालुक्यातील वडवणी, अंबाजोगाईतील लोखंडी सावरगाव, केजमधील लव्हुरी, बोरगाव बु.,परळी तालुक्यातील पोहनेर, नागापूर याठिकाणी बुधवारी आठवडे बाजार भरत असतो. मतदानाच्या दिवशी भरणारे आठवडी बाजार अन्य दिवशी भरविण्यात यावे, असेही आदेशात त्यांनी नमूद आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top