भिवंडीमध्ये भंगारच्या गोदामाला भीषण आग

ठाणे

भिवंडीमधील अंजुरफाटा ते दापोडा रस्त्यालगत असणाऱ्या एका भंगाराच्या गोदामाला काल रात्री १ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत भंगारची ४ गोदाम आणि ४ दुकान जळून खाक झाली. यामध्ये भंगार गोदाम, लाकडी प्लाउड दुकान, हॉटेल, पानटपरी, चहाचे दुकान, यांचा समावेश होता. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. आग लागलेल्या गोदामाच्या बाजूलाच एक पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपावर पेट्रोल ने भरलेले दोन टँकर देखील होते. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी वेळेवर आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. या आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top