भारत-म्यानमार सीमा बंदीला मणिपुरात आदिवासींचा विरोध

इंफाळ- भारत आणि म्यानमार सीमा बंद करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला मणिपुरातील आदिवासींनी विरोध सुरु केला आहे. भारत-म्यानमार सीमेजवळ राहणाऱ्या लोकांना एफएमआरअंतर्गत कोणत्याही कागदपत्रांशिवाय एकमेकांच्या हद्दीतील 16 किलोमीटरच्या आत जाण्याची परवानगी होती. सीमाभागाची मुभा बंद झाल्याने मणिपुरातील आदिवासी समाज आक्रमक झाला आहे.
जो युनायटेडचे प्रवक्ते गिंजा वुलजोंग यांनी सांगितले की,‘मणिपूर आणि मिझोराममधील आदिवासी समाज एफएमआर रद्द करण्याच्या निर्णयावर नाराज आहे आणि ते या निर्णयाचा मोठ्या प्रमाणावर निषेध करण्यासाठी एकत्र जमणार आहेत. आम्ही बुधवारी गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत तीन तास बैठक घेतली. आम्ही सीमाभागासह विविध समस्यांवर बैठकीत चर्चा केली. त्यांनी आमच्या समस्या ऐकल्या आणि त्यांनी या समस्या उच्च अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवतील असे आश्वसन दिली.`
जो युनायटेड ही एक समन्वय संस्था आहे. ज्यामध्ये कुकी इम्पी मणिपूर, जोमी कौन्सिल, इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरम, कमिटी ऑन ट्रायबल युनिटी, हिल ट्रायबल कौन्सिल आणि ट्रायबल कौन्सिल यासर्व संघटनांचा समावेश आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top