ओप्पो त्यांची नवीन स्मार्टफोन सीरिज रेनो 13 5जी (Oppo Reno 13 5G Series) ला लवकरच भारतासह काही देशांमध्ये लाँच करणार आहे. कंपनीने या नवीन स्मार्टफोन (New Smartphones) सीरिजबाबत घोषणा केली आहे. या सीरिज अंतर्गत कंपनी Oppo Reno 13 आणि Reno 13 Pro स्मार्टफोन्सला लाँच करणार आहे. लाँचआधीच स्मार्टफोनच्या व्हेरिएंट्स, फीचर्सबद्दल आधीच माहिती समोर आली आहे. कंपनीने नोव्हेंबर 2024 मध्ये या Oppo Reno 13 5G सीरिजला चीनमध्ये लाँच केले होते.
Oppo Reno 13 5G ची लाँच तारीख
Oppo Reno 13 5G सीरिज भारतीय बाजारात 9 जानेवारीला लाँच होणार आहे. लाँचिंगनंतर हे स्मार्टफोन्स ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट आणि ओप्पो इंडिया ई-स्टोरवर उपलब्ध असेल. हा फोन 8 जीबी/12 जीबी रॅम आणि 128 जीबी/256 जीबी स्टोरेजसह उपलब्ध होईल. फोन वेगवेगळ्या रंगात खरेदीसाठी उपलब्ध असेल.
Oppo Reno 13 5G सीरिजचे फीचर्स
लाँचआधीच ओप्पोच्या रेनो 13 5जी सीरिज स्मार्टफोनचे फीचर्स समोर आले आहेत. कंपनीने या फोन्समध्ये MediaTek Dimensity 8350 SoCs सह सिंगबूस्ट एक्स1 चिप दिली आहे. यामध्ये फोटोग्रासाठी एआय सपोर्टसह येणारे फीचर्स देखील मिळते. तसेच, धुळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी फोन्सला आयपी68 आणि आयपी69 रेटिंग मिळाले आहे.
Oppo Reno 13 Pro 5G मध्ये 50 मेगापिक्सल पेरिस्कोप टेलिफोटो शूटरसह 3.5x ऑप्टिकल झूम आणि 120एक्स पर्यंत डिजिटल झूम सपोर्ट मिळेल. यात पॉवर बॅकअपसाठी 80 वॉट वायर्ड SuperVOOC चार्जिंग सपोर्टसह 5,800 mAh बॅटरी दिली जाईल. तर Oppo Reno 13 5G मध्ये 80 वॉट वायर्ड SuperVOOC चार्जिंग सपोर्टसह 5,600mAh बॅटरी मिळेल. ओप्पोच्या या फोन्सची किंमत अद्याप समोर आलेली नाही. लाँचनंतरच फोन्सच्या किंमतीचा खुलासा होईल.