भारतीय डॉक्टरने शोधली आतड्यांच्या कॅन्सरवर लस

  • लवकरच चाचण्या होणार
    लंडन – आतड्यांचा कर्करोग या जीवघेण्या आजाराने जगभरात दरवर्षी लाखो लोक मृत्युमुखी पडतात.मात्र आता आतडयांच्या कर्करोगावर प्रभावी ठरू शकेल अशी लस शोधून काढण्यात डॅाक्टरांना यश आले असून या लसीची लवकरच चाचणी सुरू केली जाणार आहे.डॅा. टोनी धिल्लन या भारतीय वंशाच्या डॅाक्टरांनी या लसीचा शोध लावला आहे. त्यांनी गेली चार वर्षे आॅस्ट्रेलिन डाॅक्टरांच्या सहकार्याने आतडयांच्या कर्करोगावरील लशीवर संशोधन केले आहे. या संशोधनातून आतडयाच्या कर्करोगावर प्रभावी अशी लस तयार करण्यात आली आहे.

आतडयांचा कर्करोग हा कर्करोगाचा तिसरा जीवघेणा प्रकार आहे. दरवर्षी जगभरातील १२ कोटी लोकांना या रोगाची लागण होते. तर सहा कोटी लोक या आजाराला बळी पडतात. यावर प्रभावी लस आजवर उपलब्ध नव्हती. आता या लशीचा जगभरातील लाखो लोकांना फायदा होणार आहे. हा ऐतिहासिक म्हणावा असा शोध आहे. कारण या लशीमुळे आतडयांच्या कर्करोगावर शस्त्रक्रिया करण्याची गरज भासणार नाही. केवळ या लशीमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढून कर्करोगाचा प्रतिबंध करणे शक्य होणार आहे. लशीची चाचणी नक्की यशस्वी होईल असा आम्हाला ठाम विश्वास आहे,असे डॅा.धिल्लन यांनी सांगितले.ऑस्ट्रेलियातील क्विन एलिझाबेथ हॉस्पिटल आणि रॉयल सरे यांच्या संयुक्त विद्यमाने ब्रिटनच्या साऊदम्पटन विद्यापीठात कॅन्सर रिसर्च युके साऊदम्पटन क्लिनिकल ट्रायल्स युनिट या लशीची चाचणी लवकरच सुरू करणार आहे.

या लसीच्या चाचणीसाठी रुग्णांची नोंदणी करण्यासाठी १० केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. त्यापैकी ४ केंद्रे ब्रिटनमध्ये तर ६ केंद्रे ऑस्ट्रेलियामध्ये आहेत.येत्या दीड वर्षांच्या कालावधीत एकूण ४४ रुग्णांची नोंदणी करून त्यांच्यावर या लसीची चाचणी घेण्यात येणार आहे.
आतड्यांच्या कर्करोगाने ग्रस्त रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्यानंतर या लशीची चाचणी घेण्यात येणार आहे. डॅाक्टरांची अशी अपेक्षा आहे की, शस्त्रक्रिया झाल्यानंतर जर एखाद्या रुग्णाला पुन्हा कर्करोग उद्भवला तरी या लशीमुळे रोगाचा सामना करण्यासाठी रोग प्रतिकारक शक्ती निर्माण होईल.

लशीची चाचणी करण्यापूर्वी रूग्णावर एन्डोस्कोपी करून त्यांच्या पेशींची तपासणी केली जाईल. या तपासणीमध्ये संबंधीत रुग्ण लशीच्या चाचणीसाठी पात्र ठरल्यास त्याला लशीचे तीन डोस दिले जाणार आहेत.
जगभरातून निवडण्यात आलेल्या ४४ रुग्णांवर या लसीची चाचणी केल्यानंतर लस व्यावसायिक तत्त्वावर उपलब्ध करून देण्यासाठी परवाना दिला जाईल किंवा या चाचणीची व्याप्ती वाढवली जाईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top