भारताचा पहिला महिला रोबोट ‘व्योममित्रा’जुलैमध्ये अंतराळात

नवी दिल्ली-‘इस्त्रो’ अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था गगनयान या आपल्या मानवी सहभाग असलेल्या महत्त्वाकांक्षी मोहिमेआधी व्योममित्रा हा पहिला महिला रोबोट अंतराळात पाठवणार आहे. याबद्दल माहिती देताना केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले की, व्योममित्रा ही मोहीम यावर्षी जुलैनंतर पार पडणार आहे. तर गगनयान २०२५ मध्ये पाठवले जाणार आहे.व्योम (अंतराळ)आणि मित्र (मित्र) या दोन संस्कृत शब्दावरून व्योममित्रा हा शब्द बनला आहे.व्योममित्रा ही महिला रोबोट मॉड्यूलच्या पॅरामीटर्सचे निरीक्षण करू शकेल.तसेच अलर्ट जारी करू शकते. याशिवाय लाइफ सपोर्ट ऑपरेशनही पार पाडू शकते.ही महिला रोबोट अंतराळ वातावरणात मानवी क्रियांचे अनुकरण करू शकेल अशा प्रकारे या ह्युमनॉइड रोबोटची रचना आहे. जानेवारी २०२० मध्ये या रोबोटची पहिली झलक समोर आली.ह्युमनॉइड रोबोट मानवाप्रमाणे हालचाल करू शकतो.मानवी भावदेखील समजू शकतो.कृत्रिम बुद्धिमत्ता प्रोग्रामिंगद्वारे प्रश्नांची उत्तरेदेखील देऊ शकतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top