भाडेकरूंच्या पडताळणीसाठी पोलिस स्टेशनला जाण्याची गरज नाही, लवकरच सुरू होणार ऑनलाइन प्रणाली

Tenant Verification Process: अनेकदा घरमालकांकडून कोणतीही पडताळणी अथवा भाडेकरार न करता भाडेकरूंना राहण्यासाठी घर दिले जाते. मात्र, भविष्यात यामुळे मोठी समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे कोणतीही समस्या टाळण्यासाठी भाडेकरूंची पोलीस पडताळणी करणे आवश्यक आहे. आता भाडेकरूंना घरबसल्या देखील ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे

महाराष्ट्रात फेब्रुवारी अखेरपर्यंत एकात्मिक ई-नोंदणी प्रणाली लागू होणार आहे. याच्या मदतीने राज्यातील भाडेकरूंना आता पोलिस स्टेशनला तपासणीसाठी जाण्याची आवश्यकता नाही. या नवीन प्रणाली अंतर्गत जवळपास 44 हजार गावांतील 1,130 पोलिस स्टेशन जोडले जाणार आहेत.

तांत्रिक अडचण व सॉफ्टवेअर अपडेटमुळे ही प्रणाली लागू करण्यासाठी विलंब झाला. या उपक्रमामुळे भाडेकरूंच्या तपासणी प्रक्रियेला सुलभ होईल. यासाठी नोंदणी विभागाच्या डेटाबेसला पोलिस स्टेशनशी जोडण्यात येणार आहे. ही प्रणाली सुरू झाल्यानंतर भाडेकरून पोलिस स्टेशनला जाण्याची गरज नाही. पोलिस स्टेशन थेट ई-नोंदणी डेटा मिळवू शकतील.

पुणे जिल्ह्यात यापूर्वी ऑनलाइन भाडेकरू पडताळणी प्रक्रिया उपलब्ध होती. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे ही प्रक्रिया बंद पडली. सध्या ग्रामीण भागातील मालमत्ताधारकांना भाडेकरूंची माहिती, जसे की नाव, पत्ता, छायाचित्रे आणि दोन संदर्भ हेई-नोंदणीकृत दस्तऐवजांसह स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये सादर करावे लागते.

सध्या पोलिस स्टेशन आणि गावपातळीवरील डेटाचे माहिती एकत्रीकरणाचे काम सुरू आहे. ही प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर भाडेकरू पडताळणी प्रक्रिया अधिक सोपी