भरती ओहटी सुरूच असते! मुनगंटीवार अजूनही आशावादी

नागपूर -वक्त आयेगा वक्त जायेगा भरती-ओहटी सुरूच असते. त्यामुळे मंत्रिपद न मिळाल्याने मी नाराज नाही. मी अजूनही आशावादी आहे असे भाजप नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
प्रसार माध्यमांशी बोलताना मुनगंटीवार यांनी सांगितले की मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याअगोदर माझे नाव त्या यादीत आहे हे मला सांगण्यात आले होते. 13 डिसेंबरच्या सायंकाळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माझ्याबरोबर दोन-अडीच तास बसून चर्चा केली. तेव्हाही त्यांनी माझे नाव मंत्रिपदाच्या यादीत असल्याचे सांगितले. मात्र १५ डिसेंबरला काय झाले याची मला कल्पना नाही. मंत्रिमंडळाच्या यादीत असलेले नाव कसे पुसले गेले, कोणत्या पेनची शाई वापरली होती, याचा काही उलगड झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्रीपद मिळाले नसल्याने मी नाराज नाही. २३७ आमदारांपैकी ४२ आमदारांना मंत्रिपदाची संधी प्राप्त झाली आहे. विधानपरिषदेचा एक आमदार सोडला तर विधानसभेतील १९६ आमदारांना मंत्री होण्याची संधी मिळालेली नाही. त्यातलाच मी एक आहे. कोणतेही पद शाश्वत नाही. पदे मिळतात आणि जातात. भरती-ओहोटी सुरूच राहते. आता माझ्याकडे पद नाही, असे म्हणता येणार नाही. मी आमदार आहे. त्यातूनही मी जनतेची कामे करू शकतो. आजवर माझ्या मतदारसंघात जेवढी काम मी केली त्याचे कौतुक देश करतो आहे , असेही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top