ब्रिटन देश गंभीर संकटात एलिझाबेथ ट्रस यांचे वक्तव्य

लंडन – ब्रिटन गंभीर संकटात आहेत आणि भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले आहे. भारतात अनेक महत्त्वपूर्ण आर्थिक धोरणे आणि सुधारणा झाल्या आहेत, असे ब्रिटनच्या माजी पंतप्रधान एलिझाबेथ ट्रस यांनी एका कार्यक्रमात म्हटले.ब्रिटनची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत असून याबाबतही एलिझाबेथ ट्रस यांनी नाराजी व्यक्त केली. ट्रस म्हणाल्या की, भारत आपल्या अर्थव्यवस्थेत वाढ करत आहे. त्यासाठी भारतात उत्साहवर्धक वातावरणदेखील आहे. भारत दीर्घकाळापासून लोकशाहीचे प्रतिनिधित्व करणारा देश आहे. भविष्यकाळातील नेतृत्वात त्याचे महत्त्वाचे स्थान असणार आहे. दुसऱ्या बाजूला ब्रिटिश अर्थव्यवस्था लवकरात लवकर सावरेल, असे मला वाटत नाही. ब्रिटनमधील शक्तिशाली नोकरशाहीवर नियंत्रण आणल्याशिवाय सर्वकाही सुरळीत होणार नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top