ब्रिटनच्या प्रिन्स चार्ल्सना कर्करोग सार्वजनिक कामांपासून दूर राहणार

लंडन- ब्रिटनचा राजा चार्ल्स तिसरे यांना कर्करोगाचे निदान झाले आहे.बकिंगहॅम
पॅलेसने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे.मात्र कर्करोग नेमका कोणत्या स्वरूपाचा झाला आहे हे अद्याप समजलेले नाही.

बकिंगहॅम पॅलेसने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की,राजा चार्ल्स तिसरे कर्करोगाने ग्रस्त आहेत. नियमित उपचारादरम्यान त्यांच्या प्रोस्टेट ग्रंथीची तपासणी केली असता त्यांना कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले.मात्र,हा कर्करोग कोणत्या प्रकारचा आणि शरीराच्या कोणत्या भागांत आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.यामुळे डॉक्टरांनी राजा चार्ल्स यांना कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक कामापासून दूर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.तसेच जास्तीत जास्त विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.मात्र,या काळात ते सरकारी काम करत राहणार आहेत.किंग चार्ल्स कर्करोग झाला असल्याच्या वृत्तानंतर, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.तसेच ते लवकरच पूर्ण ताकदीनिशी परततील यात मला शंका नाही.मला माहीत आहे की,संपूर्ण देश त्यांच्या लवकर बरे सोशल होण्यासाठी प्रार्थना करत आहे,असे त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे म्हटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top