पनवेल
पनवेल भागातील बैलगाडा शर्यतीचे प्रेमी व हवेत केलेल्या गोळीबारामुळे कारवाई झालेले विहिगरचे पंढरी शेठ फडके यांचे आज निधन झाले.
पनवेलच्या विहिघरचे मुळ निवासी असलेले पंढरीशेठ हे आपल्या सोन्याच्या दागिन्यांसाठी व शर्यतीचे बैल विकत घेण्यासाठी ओळखले जात होते. महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीला ग्लॅमर मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. आज दुपारी ते आपल्या कार्यालयामधून घरी जात असतांना गाडीतचं त्यांना ह्दविकाराचा झटका आला त्याचचं त्यांची प्राणज्योत मालवली. बैलगाडा शर्यत बंद असलेल्या काळात या शर्यती पुन्हा सुरु व्हाव्यात यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले होते. आधी शेकापचे कार्यकर्ते असलेल्या पंढरीशेठ फडके यांनी नंतर भाजपात प्रवेश केला होता. कोणत्याही शर्यतीत आवडलेला बैल विकत घेणे व गाडीच्या टपावर बसून बैलगाडा शर्यत पाहणे यासाठी ते ओळखले जात. त्यांच्यावर गाणीही तयार करण्यात आली होती.