बॅंक कर्मचाऱ्यांना १८ टक्के पगारवाढ

मुंबई
बँक कर्मचाऱ्यांना १७% पगारवाढ देणाऱ्या करारावर युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन आणि इंडियन बँक असोसिएशन च्या प्रतिनिधी मधे करारावर अंतीम स्वाक्षऱ्या केल्या .
१२ सार्वजनिक क्षेत्रातील बँका, १० खाजगी आणि३ विदेशी बँकातील ७ लाख बँक कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांना ही पगारवाढ लागू असेल. या पगारवाढीसाठी बँक व्यवस्थापनाला दरवर्षी १२४४९ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा सहन करावा लागणार आहे.
याचवेळेस साडेसात लाख सेवानिवृत्तांना देखील दरमहा आर्थिक लाभ देण्यात येणार आहे ज्या पोटी बँकर्सना दोन हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पेलावा लागणार आहे. ही वाढ २०२२ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आली आहे. या पगारवाढीमुळे मूळ पगार, महागाई भत्ता, विशेष पगार, विशेष भत्ता, रजा, रजेचे रोखीकरण, घरभाडे भत्ता इत्यादी सेवाशर्तीत सुधारणा घडून आली आहे. महिला कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्तीत विशेष सुधारणा करण्यात आल्या आहेत. हा पगारवाढीचा करारावर ऑक्टोबर २०२७ पर्यंत लागू असेल.
याच करारात बँक कर्मचायांना पाच दिवसांचा आठवडा या मागणीला तत्त्वतः मान्यता दिली असून प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक ती प्रक्रीया पूर्ण करण्याचे मान्य केले आहे. बँकातून पुरेशी नोकर भरती करण्यात यावी, आऊटसोर्सिंग बंद करण्यात यावे याबाबत चर्चा करण्याचे मान्य करण्यात आले आहे.
देवीदास तुळजापूरकर जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र स्टेट बँक यांनी ही माहिती दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top