नवी दिल्ली- गुंतवणुकीचे नवीन पर्याय उपलब्ध होत असल्याने बँकेतील मुदत ठेवींच्या पारंपरिक पर्यायाकडील कल दिवसेंदिवस कमी होत असून म्युचिअल फंड गुंतवणूककडे लोक वळत आहेत. स्टेट बँकेच्या अहवालानुसार घरगुती बचतीमध्ये बँकांतील मुदत ठेवींचे प्रमाण २०२१ मध्ये ४७.६ टक्के होते. हे प्रमाण २०२३ मध्ये कमी होऊन ४५.२ टक्क्यांवर घसरले आहे. याचवेळी घरगुती बचतीमध्ये आयुर्विम्याचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण २०२१ मध्ये २०.८ टक्के होते, ते २०२३ मध्ये २१.५ टक्क्यांवर पोहोचले आहे. म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण २०२१ मधील ७.६ टक्क्यांवरून २०२३ मध्ये ८.४ टक्क्यांवर पोहोचले आहे.
या अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, उपलब्ध वित्तीय साधनांचा वापर करून जास्तीत जास्त परतावा मिळविण्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढली आहे.