बुलढाणा शासकीय विश्रामगृहाचा वीजपुरवठा खंडित !१३ लाख थकले

बुलढाणा – मार्च अखेर जवळ येत असल्याने थकीत बिलाची वसुली करण्याचे काम महावितरणकडून केले जात आहे. मागील काही महिन्यांपासून वीज बिल थकविणाऱ्यांवर कारवाई करत वीज पुरवठा खंडित केला जात आहे. त्यातच बुलढाणा जिल्हा मुख्यालयी असलेल्या शासकीय विश्रामगृहाचा वीज पुरवठा १३ लाखांच्या वीजबिल थकबाकीमुळे महावितरणकडून खंडित करण्यात आला आहे.

बुलढाणा शासकीय विश्रामगृह हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहे.आता लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होत आहे.त्यामुळे बुलढाण्यात मंत्र्यांसह इतर राजकीय नेत्यांचे दौरे वाढले आहेत. अशातच शासकीय विश्रामगृह अंधारात असल्याचे पाहायला मिळत आहे.विश्रामगृहात दोन विद्युत कनेक्शन आहेत. मात्र गेल्या ६ महिन्यापासून दोन्ही कनेक्शनचे १३ लाख रुपये विज बिल सार्वजनिक बांधकाम विभागाने भरलेले नाही.यामुळे शासकीय विश्रामगृहाचा संपूर्ण विद्युत पुरवठा वीज वितरण कंपनीने खंडित केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top