बीड – केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली या प्रकरणातील सहापैकी दोन आरोपींना पोलिसांनी काल अटक केली होती, तर आज पुण्यातून एका आरोपीला अटक करण्यात आली. तीन आरोपी अजून फरार आहेत. या प्रकरणी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी एका निरीक्षकाला निलंबित केले आहे.
ग्रामस्थांनी काल आरोपींना अटक करावी, आरोपींना सहकार्य करणार्या पोलिसांवर कारवाई करावी,तसेच या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी केली जावी यांसारख्या विविध मागण्यांसाठी मस्साजोग येथे रास्ता रोको आंदोलन केले होते. पोलिसांनी फरार आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. तसेच केज शहरासह मस्साजोग येथे पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे.