बीडच्या नायगाव टेकडीवरील ४१ फूट हनुमानाची मूर्तीची पूजा

बीड – बीडच्या नायगाव टेकडीवर ४१ फूट उंच हनुमानाची मूर्ती आहे. ही मूर्ती ६ वर्षांपूर्वी नायगाव टेकडी या ठिकाणी महंत ह. भ. प. शिवाजी महाराज येवले यांनी उभारली होती . पैठण परिसरातील आपली दोन एकर जमीन विकून तब्बल २५ लाख रुपयांच्या खर्चातून मूर्ती उभी केली आहे.

यावर्षी महंत शिवाजी महाराज येवले यांनी हनुमान मूर्तीच्या अगदी जवळ प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर देखील बांधले. त्या ठिकाणी प्रभू श्रीराम , लक्ष्मण व सीतामाता यांच्या साडेपाच फुटाच्या मूर्ती बसवण्यात आल्या आहेत. हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी आज हनुमान मूर्तीची महापूजा करण्यात आली.