बिहारमध्ये पप्पू यादव भाषणावेळी ढसाढसा रडले

पाटणा- काही दिवसांपूर्वी पक्षासहित काँग्रेसमध्ये सामील झालेले माजी खासदार राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांनी गुरुवारी बिहारच्या पूर्णिया लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारीचा अर्ज दाखल केला.काँग्रेसमधील नाराज नेते पप्पू यादव हे दुचाकीवरून निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोहोचत अर्ज दाखल केला. मात्र त्यानंतर आयोजित सभेत पप्पू यादव स्टेजवर भाषणादरम्यान ढसाढसा रडले.

‘माझी मागील १४ दिवसांपासून छळवणूक होत आहे, असा आरोप पप्पू यादव यांनी यावेळी केला. पप्पू यादव म्हणाले की,’मी शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेससोबत राहणार आहे. मी पूर्णिया लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून ही निवडणूक लढणार आहे. अनेकांनी माझी राजकीय हत्या करण्याचा प्रयत्न केला.पूर्णियाची जनता ही मला नेहमी जाती-धर्मापेक्षा मोठी आहे.मला ‘इंडिया आघाडी’ मजबूत करायची आहे.माझा निश्चय आहे की, राहुल गांधी यांना मजबूत करायचे आहे. मी केवळ पूर्णियाच्या लोकांसाठी निवडणूक लढत आहेत, कारण येथील जनतेची इच्छा आहे.मी नेहमी पूर्णिया, सीमांचल आणि बिहारमधील लोकांच्या कल्याणासाठी लढत राहणारआहे’.

दरम्यान,याआधी १९९० या दशकात पूर्णिया लोकसभा मतदारसंघातून पप्पू यादव यांनी तीन वेळा प्रतिनिधित्व केले आहे. लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील पूर्णिया लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे.पप्पू यादव यांनी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचे संकेत दिले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top