बिश्नोईच्या फोटोचे टी-शर्ट विक्री! फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल

मुंबई- – गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा फोटो असलेल्या टी-शर्टची विक्री केल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबर विभागाने गंभीर दखल घेत संबंधित ई-कॉमर्स वेबसाईट आणि विक्रेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी म्हणाले की, फ्लिपकार्ट, अलीएक्सप्रेस, टीशॉपर आणि एट्सी सारख्या अनेक ई-कॉमर्स प्लेटफॉर्मवरुन गँगस्टर लॉरेंस बिश्नोईचे छायाचित्र असलेले टी-शर्ट खुलेआम विक्री करत होते. अशा उत्पादनामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला बळ मिळते. यामुळे तरुणाईवर नकारात्मक आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा प्रभाव पडतो. अशा वस्तू समाजिक मुल्यांचे अध:पतन करणाऱ्या असून समाजातील गुन्हेगारी प्रवृत्तीला बळ देतात. तरुणाई वाईट मार्गाला जाऊन एका पिढीचे आयुष्य उध्वस्त होण्याची शक्यता आहे. म्हणून महाराष्ट्र गुन्हे शाखेने गंभीर दखल घेत संबंधित ई-कॉमर्स वेबसाईट आणि विक्रेत्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ च्या कलम १९२, १९६, ३५३, ३ आणि आयटी अधिनियम, २००० च्या धारा ६७ अन्वये गुन्हे दाखल केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top