राजापूर – रत्नागिरी जिल्ह्यातील वनविभागाने राजापूर शहरात घुसणार्या बिबट्यावर नजर ठेवण्यासाठी आता सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत.शहरात अनेकांनी बिबट्याला पाहिल्यामुळे
याबाबत वन विभागाकडे पाठपुरावा केल्यावर आता बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी शहरातील झरी रोड परिसरात कॅमेरे बसवले आहेत.
राजापूर नगरपरिषदेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष अॅड.जमीर खलिफे आणि त्यांच्या सहकार्यांना काही दिवसांपूर्वी बिबट्या दिसून आला. काही नागरिकांनाही बिबट्या दिसला होता. अशाप्रकारे राजापूर शहरात विविध भागांत बिबट्याचा वावर आढळून आल्यावर घबराट पसरली होती.या पार्श्वभूमीवर जमीर खलिफे यांनी राजापूर वन अधिकारी कार्यालय येथे संपर्क साधून झरी रोड परिसरात कॅमेरा बसविण्याची मागणी केली होती.या पाठपुराव्यामुळे वन विभागाचे गुरव यांनी ज्या ठिकाणी बिबट्या दिसून येत आहे,त्या झरी रोड परिसरात सचिन शिंदे यांच्या घराजवळ तसेच कुडाळकर यांच्या घराजवळ असे दोन कॅमेरे आणून बसवले आहेत. यामुळे आता बिबट्याचा संचार कशा पद्धतीने होतोय, हे नेमके समजू शकणार आहे आणि त्यानंतर वन विभागाला योग्य ती कार्यवाही करता येणार आहे.