बारामती – बारामतीतून विधानसभेची निवडणूक लढविण्याचा आग्रह करणारी १ लाख ११ हजार ७०७ पत्र अजित पवार यांना त्यांच्या समर्थकांनी पाठविली आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते किरण गुजर यांनी ही माहिती दिली.
निवडणूक लढवायची नाही असा निर्णय अजित पवार एके घेऊ शकत नाहीत. गेली ३५ वर्षे बारामतीकरांनी अजित पवारांना प्रेम दिले. विधानसभा निवडणुकीतही बारामतीकर अजित पवार यांनाचा मतदान करतील. त्यामुळे बारामतीतून त्यांनीच निवडणूक लढवावी,असा आग्रह या पत्रांद्वारे समर्थकांनी केला आहे,असे गुजर यांनी सांगितले.
गुजर यांच्याकडे अजित पवार यांनी बारामती शहर आणि तालुक्यातील बूथ कमिटींची फेररचना करण्याची जबाबदारी सोपवली आहे.