बंदी घातलेली पेटीएम कंपनी मुकेश अंबानी विकत देणार?

मुंबई – रिझर्व्ह बँकेच्या बंदी कारवाईनंतर पेटीएमची मुख्य कंपनी वन ९७ कम्युनिकेशन कंपनी संकटात सापडली आहे.या कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने घसरण होताना दिसत आहे.आता हीच कंपनी रिलायन्सचे मुकेश अंबानी विकत घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.या वृत्तानंतर अंबानी यांच्या एनबीएफसी कंपनी जिओ फायनान्शियल कंपनीचे शेअर्सने उसळली मारली.काल या कंपनीचे शेअर्स तब्बल १५.२१ टक्क्यांनी वाढले होते.

मुकेश अंबानींच्या मालकीची एनबीएफसी आणि खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी बँक कंपनीच्या विक्रीबाबत बोलणी करत असल्याचे सांगण्यात येत आहे. एचडीएफसी बँक आणि जिओ फायनान्शियल पेटीएम वॉलेट बिझनेस विकत घेण्यासाठी तयार आहेत.पेटीएमचे सीईओ विजय शेखर शर्मा यांची टीम नोव्हेंबरपासून जिओ फायनान्शियलशी चर्चा करत असल्याचे सांगण्यात येत आहे.परंतु पेटीएम पेमेंट्स बँकेवर आरबीआयने बंदी घातल्यानंचर एचडीएफसी बँकेशी चर्चा सुरु झाली.

दरम्यान,रिझर्व्ह बँकेने काही दिवसांपूर्वी पेटीएम पेमेंट्स बँकेवर निर्बंध लादले होते. त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरु आहे.सोमवारी शेअर बाजारात पेटीएमचा शेअर ४३८.५० रुपयांवर आला होता.त्यावेळी जवळपास ४२.४ टक्क्यांनी पेटीएमच्या शेअरमध्ये घसरण झाल्याचे दिसून आले.पेटीएम पेमेंट्स बँकेच्या १ हजारहून अधिक ग्राहकांना खाती एकाच पॅन कार्डशी जोडली गेली होती. त्यामुळे आरबीआयला अनियमिततेचा संशय आला. त्याबद्दल बँकेला नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतर पेटीएमने चूक दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न केले.त्यानंतर केवायसीमध्येही काही चुका असल्याचे समोर आले. त्यामुळेच आरबीआयने पेटीएम पेमेंट्सवर कारवाई केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top