फिलिपाईन्समध्ये भूस्खलन ६ जणांचा मृत्यू ! ४६ बेपत्ता

मनिला – सोन्याचे खाणकाम सुरू असलेल्या दक्षिण फिलिपाईन्समधील एका गावात मुसळधार पाऊस आणि पुरामुळे भुस्खलन झाल्याची घटना घडली.या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला.तर ३१ गावकरी जखमी झाले असून ४६ जण बेपत्ता असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकार्‍यांनी सांगितले.
दावो दे ओरो प्रांतातील माको या दुर्गम गावापासून जवळ असलेल्या मसारा या गावात ही भुस्खलनाची घटना घडली.मंगळवारी रात्री सोन्याचे खाणकाम असलेल्या भागात काही खाण कामगार दोन बसमध्ये बसून घरी जाण्याच्या प्रतिक्षेत होते.त्याचवेळी अचानक कोसळलेली दरड या बसच्या दिशेने वेगात आली आणि बसवर धडकली.यावेळी आठ कामगारांनी बसच्या खिडक्यांमधून उड्या मारून पळ काढला.तिसरी बस या घटनेच्या आधीच निघाली होती.जखमी झालेल्या ३१ गावकऱ्यांना लष्कराच्या तुकड्या,पोलीस आणि स्वयंसेवकांनी वाचवले. भूस्खलनाच्या भीतीने पाच गावातील ७५० हून अधिक कुटुंबांना स्थलांतर केंद्रात हलवण्यात आले आहे,अशी माहिती दावो डी ओरो प्रांतीय प्रवक्ते एडवर्ड मॅकापिली यांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top