प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिराचा उज्जैनच्या धर्तीवर विकास करणार

*महापालिका तब्बल
५०० कोटी खर्च करणार

मुंबई- प्रभादेवी परिसरातील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराचा आता कायापालट होणार आहे. या मंदिराचा उज्जैनच्या धर्तीवर विकास केला जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच या मंदिराच्या पुनर्नियोजनांच्या प्रकल्पाची घोषणा केली.महापालिका त्यासाठी ५०० कोटी खर्च करणार आहे.

सिद्धिविनायक मंदिर परिसराचा उज्जैनच्या महाकाल मंदिराप्रमाणे विकास करण्यात येणार आहे.या मंदिराच्या सुशोभीकरणासाठी आणि पुनर्नियोजनासाठी उज्जैन मंदिराच्या वास्तुशास्त्रज्ञाची नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी महापालिका ५०० कोटी रुपये खर्च करणार आहे. या कामासाठी महापालिकेच्या जी-उत्तर विभागाने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यात येणार आहे. यासाठीही निविदा मागविण्यात आल्या आहेत. या कामासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार आणि वास्तुशास्त्रज्ञ नेमले जाणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top