मुंबई – राज्य सरकारने वरळीच्या पोद्दार रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू करण्यास मान्यता दिली आहे.त्यामुळे आता या रुग्णालायात ३० खाटांचा अतिदक्षता विभाग सुरू केला जाणार आहे. पुढील दीड वर्षांत हा विभाग उभारण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे.
हा अतिदक्षता विभाग नव्याने सुरू करण्यासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची पदनिर्मिती आणि यंत्रसामग्री खरेदी प्रक्रिया सुरू केल्याचे प्रतिज्ञापत्र राज्य शासनाने राज्य मानवी हक्क आयोगाकडे काल सादर केले.दीड लाख लोकसंख्या असलेल्या वरळी विभागातील अत्यवस्थ रुग्णांवर वेळीच उपचार होऊन त्यांचे प्राण वाचविण्यासाठी पोद्दार रुग्णालयात अत्यावश्यक व अद्ययावत वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठीवरळी बीडीडी चाळ क्र.१ येथील शांती वैभव बुद्ध विहार,नवतरूण क्रीडा मंडळ आणि माता रमाई प्रेरणा महिला मंडळाच्या वतीने गेल्या ५ वर्षांपासून मागणी करण्यात येत होती.अखेर अतिदक्षता विभाग सुरू करण्यास राज्य मानव हक्क आयोगाने मंजुरी दिली. त्यामुळे आता इथे ३० खाटांचा अतिदक्षता विभाग सुरू करण्यात येणार आहे.