पॅरिस – पाच वर्षांपूर्वी आगीत खाक झालेले फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील सीन नदीच्या एका बेटावरील ऐतिहासिक वारसा असलेले नोत्र दाम कॅथेड्रल ५ वर्षांनतर पुन्हा खुले करण्यात आले.त्यानिमित्त झालेल्या विशेष सोहळ्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प,त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉ, ब्रिटनचे राजपुत्र विल्यम आणि युक्रेनचे राष्ट्रध्यक्ष झेलेन्स्की यांच्यासह १५०० मान्यवर उपस्थित होते.
या चर्चला १५ एप्रिल २०१९ रोजी संध्याकाळी आग लागली होती.या आगीत हे चर्च जळून खाक झाले होते. त्यानंतर चर्चच्या पुनर्बांधणीचे काम सुरू करण्यात आले.या कामात २ हजार कामगारांनी सहभाग घेतला होता. त्यासोबत पुनर्बांधणीसाठी ७३७ दशलक्ष डॅालरचा खर्च झाला असून अनेक देशांतील ३,४०,००० लोकांनी देणग्या दिल्या आहेत.