हैदराबाद- संपूर्ण देशभरात आज ‘पुष्पा २’चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र काल रात्री हैदराबादच्या आरटीसी चौकातील संध्या थिएटरमध्ये‘पुष्पा २’च्या प्रीमियरचे आयोजन केले होते. यावेळी थिएटरबाहेर या चित्रपटाचा अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांनी पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी झाल्यामुळे चेंगराचेंगरीची झाली. त्यात एका महिलेचा मृत्यू झाला,तर तिचा नऊ वर्षांचा मुलगादेखील गंभीर जखमी झाला.
काल रात्री ९.३० वाजता झालेल्या पुष्पा-२ च्या प्रीमियर शोसाठी चित्रपटाचा अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांनी हजेरी लावली. मात्र त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची इतकी गर्दी झाली की, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. चेंगराचेंगरी रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.या चेंगराचेंगरीत रेवती (३५) आणि त्यांचा मुलगा श्रीतेजा (९) खाली पडले. त्यांना जमावाने पायाखाली चिरडल्याने दोघेही गंभीर जखमी झाले.या दोघांना बेशुद्धावस्थेत पोलिसांनी बाजुला नेऊन कृत्रिम श्वासोच्छवास दिला. त्यानंतर त्यांना तत्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.मात्र उपचारादरम्यान रेवती यांचा मृत्यू झाला. या महिलेचा मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला निम्स येथे हलवण्यात आले.रेवती यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.या चेंगराचेंगरीत इतर नागरिकही किरकोळ जखमी झाले.याप्रकरणी चिक्कडपल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.