पुतीन यांच्याकडून किम जोंगना २४ उमद्या अश्वांची भेट

मॉस्को – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी उत्तर कोरियाचा हूकुमशाह किम जोंग यांना २४ जातीवंत उमदे घोडे भेट दिले आहेत. उत्तर कोरिया बरोबरच्या मैत्रीचे प्रतिक म्हणून हे घोडे भेट म्हणून पाठवण्यात आले आहेत.जागतिक राजकारणात रशिया व अमेरिका हे कायम एकमेकांचे शत्रू राहिलेले आहेत. त्यानुसारच त्यांची इतर देशांशी मैत्री असते. लहान देशांना आपल्याकडे वळवतांना ते शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या उक्तीचा वापर करतात. दक्षिण कोरियाची अमेरिकेबरोबरची मैत्री व उत्तर कोरियाबरोबरचे शत्रूत्व यामुळे रशियाला उत्तर कोरिया आपलासा वाटतो. पुतीन व किम जोंग यांची हुकूमशाही मनिषाही लपून राहिलेली नाही. समविचारींची मैत्री याप्रमाणे त्यांची मैत्री आहे. पुतीन यांच्या उत्तर कोरिया भेटीदरम्यान किम जोंग यांनी त्यांना दोन पंगसन श्वान दिले होते. आता पुतीन यांनी त्यांना जातीवंत २४ उमदे अश्व दिले आहेत. यातील एका घोड्यावर बसून रपेट केल्याची छायाचित्रे व व्हिडीओ किम जोंग यांनी प्रसारित केली आहेत. उत्तर कोरियाच्या इतिहासात घोड्यांना महत्त्व आहे. किम जोंग यांच्या छायाचित्रांवरुन देश समर्थ व्यक्तीच्या हातात आहे असा संदेश त्यांना द्यायचा आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top