पुण्यात पब, बार, रेस्टॉरंट मध्यरात्री दीड वाजेपर्यंत सुरू राहणार

पुणे – पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी ‘शहरातील बार, रूफ टॉप हॉटेल,पब आणि रेस्टॉरंट मध्यरात्री दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. सर्व नियमांचे पालन करणाऱ्यांना ही परवानगी असून पोलिसांकडून या रेस्टॉरंटना आता ११ वाजता बंद करण्यासाठी तगादा लावला जाणार नाही.

अमितेशकुमार यांनी पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर शहरातील रेस्टॉरंट,बार,रूफ टॉप हॉटेल आणि पबचालकांसाठी एक नियमावली तयार केली होती. ही नियमावली प्रायोगिक तत्त्वावर १५ दिवसांसाठी लागू करण्यात आली होती.तर त्यावरून कलम १४४ नुसार जमावबंदीचा आदेशही काढला होता. त्यावर नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी पोलिस आयुक्तालयात हॉटेल आणि चालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये नियमावलीबाबत हरकती व सूचनांसह त्यांच्या अडीअडचणींवर चर्चा झाली. त्यानुसार पोलिस आयुक्तांनी नियमावलीत काही बदल करण्याचा निर्णय घेतला आणि ही परवानगी देण्यात आली. यामध्ये बार,रेस्टॉरंट चालकांना नाहक त्रास देण्यात येऊ नये, अशा सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top