पुणे- पुण्यात गेल्या तीन दिवसांत गोळीबाराची तिसरी घटना घडली आहे. वाळू व्यवसायिकावर गोळीबार झाल्याने शहरात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडली आहे. हा हल्ला पूर्व वैमन्यासातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
दिलीप गायकवाड असे वाळू सप्लाय करणाऱ्या व्यावसायिकाचे नाव आहे. कोंढव्यातील साळवे गार्डन समोर गोळीबाराची घटना घडली आहे. गायकवाड यांच्या गाडीवर आलेल्या अज्ञात तरुणांनी वरती दोन ते तीन गोळ्या झाडल्या आहेत. गोळीबारात जखमी झालेल्या गायकवाड यांना रुग्णालयात दाखल झाल्या असून त्याची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. हल्ला करणार्या तरुणांची ओळख पटवण्याचे काम पोलिस करत आहेत. घटनास्थळावरून पोलिसांनी दोन संसयितांना ताब्यात देखील घेतले आहे. उरळी कांचन येथे एका व्यक्तीवर गोळीबार झाला होता. जमिनीच्या वादातून हा हल्ला झाल्याचे सांगण्यात आले. कालही दोन गटांत गोळीबार होऊन त्यात एकाचा मृत्यू झाला होता, तर एक जखमी झाला आहे. गोळीबाराच्या सतत घडणार्या घटनांमुळे नागरिकांकडून कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्चचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.