पुण्यातील मध्यवर्ती पेठांमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद

पुणे – शहरातील पर्वती जलकेंद्रांतर्गत “एमएलआर’ टाकीतून भवानीपेठ आणि पेठांमधील काही भागांस ६०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा केला जातो. या जलवाहिनीला स्वारगेट मेट्रो स्टेशनजवळ मोठी गळती लागली आहे. या जलवाहिनीची गुरुवार २५ जुलै रोजी दुरूस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे भवानीपेठ परिसरासह मध्यवर्ती पेठांच्या अनेक भागात गुरुवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी उशिरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाणार आहे, असे महापालिकेने म्हटले आहे.

यादिवशी शंकरशेठ रोड परिसर, गुरुवार पेठ, बुधवार पेठ,काशेवाडी,क्वार्टरगेट परिसर,गंज पेठ,भवानी पेठ, नाना पेठ, लोहियानगर, सोमवार पेठ,अरुण वैद्य स्टेडियम परिसर,घोरपडे पेठ,लक्ष्मीनारायण टॉकीजमागील परिसर, पर्वती दर्शन आणि मित्रमंडळ कॉलनीचा काही भाग, सारसबाग परिसर, खडकमाळ आळी, शिवाजी रस्ता परिसर, मुकुंदनगर, महर्षिनगरचा काही भाग, टिमवी कॉलनी, मीनाताई ठाकरे वसाहत,अप्सरा टॉकीज परिसर,मीरा आनंद परिसर,श्रेयस सोसायटी आदी भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top