पुणे
पुण्यातील अनेक भागात गुरुवारी महापालिकेच्या विविध पाणी केंद्र आणि पंपिंग स्टेशनच्या देखभाल दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, मुंबई-पुणे बायपास रोड दोन्ही बाजू, पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी परिसर, कोपरे कोंढवे धावडे जलकेंद्र, वडगाव जलकेंद्र परिसर, कात्रज – कोंढवा बुद्रुक परिसर, भामा आसखेड जलकेंद्र परिसर, लष्कर ते खराडी पंपिंग क्लोजर, लष्कर जलकेंद्र भाग या भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे.